नाशिकमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे आज नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या वेळी बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, "मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरोग्य क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत गरजू नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विकेंद्रीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे."राज्यभरातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयात हा मदत कक्ष सुरू करण्याचे उद्दिष्ट असून, नाशिक येथील हा कक्ष त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीसाठी आता मुंबईच्या कार्यालयात धाव घेण्याची गरज भासणार नाही, असेही महाजन यांनी सांगितले.या कार्यक्रमास विविध अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा