महाराष्ट्र दिन व कामगार प्रतिभा सन्मान सोहळा ओशन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे उत्साहात साजरा
जामनेर, दि. ०१ मे २०२५
दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE Pattern), जामनेर येथे महाराष्ट्र दिन व कामगार प्रतिभा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी ध्वजारोहणाचे व उद्घाटनाचे कार्य शाळेचे सेक्रेटरी श्री. दिनकर वायकर व चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय होती. यात प्रमुख उपस्थित म्हणून सौ. सीमा श्रोत्रिया, सौ. सूचिता सोनवणे, सौ. कोमल शिंदे, कु. संजना सपकाळे, सौ. नितु शर्मा या शिक्षिकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचारी कु. निलिमा, सौ. संगिता जगताप, सौ. सुवर्णा कोळी, श्री. श्रवण गायकवाड, श्री. मुकेश नारखेडे, श्री. अक्षय शिंदे, श्री. नवल पवार, श्री. समाधान महाजन यांचा समावेश होता.कार्यक्रमात सौ. सीमा श्रोत्रिया मॅडम यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व पटवून देणारे प्रभावी भाषण केले. यानंतर विविध कार्यक्षमतेसाठी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सर्वोत्तम शिक्षक, सहकारी व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून निवड झालेल्या व्यक्तींना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची (वैष्णव जेवण) व्यवस्थाही करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा