महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव – महाराष्ट्र दिनानिमित्त जळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आज (दि. १ मे) ध्वजारोहण सोहळा अत्यंत सन्मानपूर्वक पार पडला. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना डॉ. रेड्डी यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads