कसबापिंप्रीच्या सना शेख बनली पहिली मुस्लिम महिला डॉक्टर — ग्रामीण भागातील मुस्लिम समाजासाठी प्रेरणादायी यश - दैनिक शिवस्वराज्य

कसबापिंप्रीच्या सना शेख बनली पहिली मुस्लिम महिला डॉक्टर — ग्रामीण भागातील मुस्लिम समाजासाठी प्रेरणादायी यश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री गावातील सना जलील शेख हिने मुस्लिम समाजातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवत गावासह संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढविला आहे. सना हिने बी.यू.एम.एस. (B.U.M.S.) वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ग्रामीण व सामाजिक मर्यादा मोडीत काढत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
सना शेखचे प्राथमिक शिक्षण फत्तेपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत झाले. आठवी ते दहावीचे शिक्षण तिने तोंडापूर येथील इकरा हायस्कूलमध्ये पूर्ण केले, तर अकरावी व बारावीचे शिक्षण जळगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये घेतले. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तिने NEET परीक्षेची तयारी करत २०१८ मध्ये इकरा युनानी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अखेर २०२५ मध्ये तिला बी.यू.एम.एस. पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीदान समारंभावेळी तिचे आई-वडील उपस्थित होते.
या यशानंतर कसबा पिंप्री गावात सना शेखच्या स्वागताचा जल्लोष करण्यात आला. मुस्लिम पंच कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी, जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.सना शेखचे यश हे केवळ तिचेच नाही, तर शिक्षणासाठी झगडणाऱ्या ग्रामीण व मुस्लिम समाजातील अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा देणारे ठरले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads