फलोत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते गौरव - दैनिक शिवस्वराज्य

फलोत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते गौरव

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव | पाचोरा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश जाधव यांचा फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हास्तरीय सन्मान करण्यात आला. दिनांक 8 मे रोजी जिल्हा विकास समन्वय व दिशा समितीच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे पार पडलेल्या 2024-25 च्या पुरस्कार वितरण समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या समारंभात एकूण 130 अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध योजनांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये पाचोरा तालुक्याचे कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी फलोत्पादन विषयक उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल विशेष सन्मान मिळवला.

श्री. जाधव यांनी 2024-25 या कालावधीत उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचे 720 हेक्टरचे लक्ष्य असताना 1121 हेक्टर काम पूर्ण करून 155% टक्के कामगिरी केली. त्यांच्या या आदर्शवत कामगिरीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. जाधव यांनी यापूर्वी जामनेर तालुक्यात कार्यरत असताना फळबाग, जलयुक्त शिवार आणि पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सक्रिय सहभाग घेत अनेक गावांना 'पाणंदार' बनवण्यासाठी झपाटून काम केले. सकाळ-संध्याकाळ शेतकऱ्यांमध्ये राहून प्रशिक्षण, श्रमदान, आर्थिक मदत आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून त्यांनी ‘वॉटर योध्यां’ना घडवले.

त्यांचा शेतकऱ्यांवरील जिव्हाळा, ग्रामीण विकासासाठीची तळमळ आणि नवकल्पनांमधून केलेली मेहनत यामुळेच त्यांचा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरतो आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads