बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात ‘वन्यजीव गणने’चा अद्वितीय अनुभव — यावल वनविभागाचा उपक्रम १२ मे रोजी
बुद्ध पौर्णिमेच्या शुभप्रसंगी यावल वनविभागात एक वेगळाच उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. १२ मे २०२५ रोजी ‘निसर्ग अनुभव व प्राणीगणना’ या विशेष कार्यक्रमांतर्गत नागरिकांना जंगलात प्रत्यक्ष मचाणावर बसून वन्यजीव निरीक्षणाची रोमांचक संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी यावल वनविभागाने एकूण ३९ मचाणे उभारली असून, विविध वनक्षेत्रांमध्ये हे मचाण उपस्थित असणार आहेत. रात्रीच्या शुद्ध चांदण्यात जंगलातील वास्तव पाहण्याचा हा एकमेव योग आहे.
मचाणांची रचना पुढीलप्रमाणे आहे:
चोपडा वनक्षेत्र – ३
वैजापूर वनक्षेत्र – ७
अडावद वनक्षेत्र – ५
देवझिरी वनक्षेत्र – ५
यावल पूर्व – ६
यावल पश्चिम – ५
रावेर वनक्षेत्र – ८
कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्ये:
बिबट, अस्वल, सांबर, चितळ, रानडुक्कर, नीलगाय, मोर यांसारख्या प्राण्यांचे थेट दर्शन.
मचाणांवरून जंगल निरीक्षणाचा थरार.
पक्षी निरीक्षण, जंगलातील आवाजांचा अनुभव.
विद्यार्थ्यांसह वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम संधी.
ऑनलाईन QR कोड नोंदणीची सुविधा उपलब्ध.
प्रती व्यक्ती शुल्क: फक्त ५००/- रुपये, ज्यामध्ये भोजन व इतर सुविधा समाविष्ट आहेत.
संपर्क व मार्गदर्शन:
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त श्रीमती निनू सोमराज,
उपवनसंरक्षक यावल श्री जमीर शेख,
सहाय्यक वनसंरक्षक चोपडा श्री प्रथमेश हाडपे,
सहाय्यक वनसंरक्षक यावल श्री समाधान पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
निसर्गप्रेमींनो, ही संधी चुकवू नका! बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी वन्यजीवांच्या सान्निध्यात एक अनोखा अनुभव घ्या
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा