जामनेरपुरा शिवारात वीज कोसळल्याने ३ म्हशींचा दुर्दैवी मृत्यू, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
जामनेरपुरा शिवारात आज रात्री सुमारास झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून तीन म्हशी जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे संबंधित शेतकरी हतबल झाला असून, त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकरी विजय परदेशी यांच्या गोठ्याजवळ म्हशी चरायला सोडलेल्या असताना अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणांतच जोरदार वीज जमिनीवर कोसळली. यात तीन म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या.
या म्हशी उच्च दूध उत्पादन देणाऱ्या होत्या, त्यामुळे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपये इतकं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. शेतकरी कुटुंबासाठी हा धक्का फार मोठा आहे. पशुवैद्यकीय अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा