जामनेर तालुक्यातील देवपिंपरी आणि शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ — एकूण ४१६ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील देवपिंपरी आणि शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ — एकूण ४१६ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर (ता. २३ मे):
घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या वाळूचे मोफत वितरण करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ जामनेर तालुक्यातील मौजे देवपिंपरी आणि मौजे शहापूर या गावांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. हा शुभारंभ मा. विनय गोसावी (उपविभागीय अधिकारी, जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आला.
देवपिंपरी (वाघूर नदीपात्रात) व शहापूर (खडकी नदीपात्रात) येथे ऑनलाईन ईटीपी (ETP) जनरेट करून लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरित करण्यात आली. यासाठी ऑनलाईन पासेस तयार करण्यात आले असून, वितरण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली.

या कार्यक्रमावेळी पुढील मान्यवर उपस्थित होते

मा. विनय गोसावी – उपविभागीय अधिकारी, जळगाव

तहसीलदार, जामनेर

गटविकास अधिकारी, जामनेर

ग्राम महसूल अधिकारी, देवपिंपरी आणि शहापूर

ग्राम पंचायत अधिकारी, देवपिंपरी आणि शहापूर

पोलीस पाटील, देवपिंपरी आणि शहापूर

संबंधित घरकुल लाभार्थी नागरिक


देवपिंपरी येथे एकूण २०८ लाभार्थ्यांना आणि शहापूर येथे २०८ लाभार्थ्यांना, अशा एकूण ४१६ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेसद्वारे वाळू वाटप करण्यात आले.

प्रशासनाच्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना वाळूसाठी होणाऱ्या आर्थिक खर्चातून मोठा दिलासा मिळाला असून, शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे यावरून दिसून आले.


Previous article
Next article

5 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads