जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते पुरस्कार - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते पुरस्कार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, दि. ८ मे जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इंगळे साहेब व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.हा गौरव सोहळा आज सकाळी नियोजन भवन, जळगाव येथे पार पडला. जिल्हा विकास समन्वय व दिशा समितीच्या 2024-25 या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात एकूण १३० अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध योजनांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 या प्रसंगी जामनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोकजी पालवे, स्थापत्य अभियंता वाकडे साहेब, DEO श्रीराम पाटील, RHE मयुर मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.
गौरव करण्यात आलेल्या योजनांमध्ये रेल्वे सेवा, विमान सेवा, राष्ट्रीय महामार्ग, सिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आदिवासी ग्रामविकास योजना अशा केंद्र पुरस्कृत महत्त्वाच्या योजनांचा समावेश होता.यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, सी ओ मॅडम सह सर्वच अधिकारी उपस्थित होते





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads