शेंदुर्णी नगरपंचायतीकडून मान्सूनपूर्व नालेसफाई मोहीम राबविण्यात – स्वच्छतेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
शेंदुर्णी (ता.जामनेर) – आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेंदुर्णी नगरपंचायतीने नालेसफाईसाठी मोहीम सुरू केली असून, शहरातील नाल्यांमधील गाळ, कचरा व अडथळे दूर करून पावसाचे पाणी सुरळीत वाहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार व यंत्रसामग्री यांच्या सहाय्याने नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरात ठिकठिकाणी हे स्वच्छता अभियान चालू आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये व नागरिकांना त्रास होऊ नये.नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून नाल्यात कचरा न टाकता ठरविक ठिकाणीच कचरा टाकावा, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून, शेंदुर्णी शहर पावसाळ्यासाठी सज्ज असल्याचे चित्र यामधून दिसत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा