जामनेर -बोदवड रस्त्याने भीषण अपघात....
जामनेर तालुक्यातील वडगाव टीग्रे येथील राहुल ब्रह्मदे यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.जामनेर तालुक्यातील वडगाव टीग्रे येथील युवक राहुल ब्रह्मदे यांचा बोदवड रोडवरील आज रात्री 9 वाजेच्या आसपास नर्सरीजवळ भीषण अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांना फोन करून मदतीसाठी बोलावले.घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्यदूत राजपूत यांनी एक क्षणही न दवडता घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी राहुलला तत्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा