वयोवृद्ध नागरिकांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून उपकरणांसाठी अनुदान – तातडीने कागदपत्रे सादर करा - दैनिक शिवस्वराज्य

वयोवृद्ध नागरिकांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून उपकरणांसाठी अनुदान – तातडीने कागदपत्रे सादर करा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, दि. ३० एप्रिल 
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील जळगाव जिल्ह्यातील अनेक वृद्धांना सहाय्यक उपकरणांसाठी अनुदान मंजूर झाले आहे. मात्र, काही लाभार्थ्यांच्या आधारकार्ड व बँक तपशीलातील किरकोळ चुका अनुदान वितरणात अडथळा ठरत आहेत.

संबंधित लाभार्थ्यांची यादी jalgaon.gov.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर समाजकल्याण विभागाच्या पेजवर उपलब्ध आहे. सहाय्यक आयुक्त श्री. योगेश प्रविणसिंग पाटील यांनी कळवले की, लाभार्थ्यांनी आपल्या आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात किंवा विभागाच्या WhatsApp क्रमांक ९४२३१८४७६७ वर त्वरित पाठवावी.

"ही सुवर्णसंधी गमावू नका – कागदपत्रे सादर करा आणि सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्या – श्री. पाटील यांचे आवाहन.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads