वादळी वारे व बेमोसमी पावसाचा इशारा : पशुधनधारकांनी घ्यावी विशेष काळजी – जिल्हा प्रशासनाचा इशारा - दैनिक शिवस्वराज्य

वादळी वारे व बेमोसमी पावसाचा इशारा : पशुधनधारकांनी घ्यावी विशेष काळजी – जिल्हा प्रशासनाचा इशारा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, ८ मे ( हवामान विभागाने पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात वादळी वारे आणि बेमोसमी पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पशुधनधारकांनी जनावरांची आणि पक्ष्यांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाने सांगितले की, अशा हवामानात जनावरांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गोठ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरे झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत बांधणे टाळावे, तसेच धोकादायक झाडांची छाटणी करावी.

पशुधनासाठी महत्त्वाच्या सूचना 

नदीपात्राजवळ किंवा साचलेल्या पाण्याजवळ जनावरे नेऊ नयेत.

विजेच्या खांबाजवळ, डीपीच्या परिसरात ओल्या जमिनीवर जनावरे ठेवू नयेत.

गोठ्यातील विजेच्या तारांची तपासणी करून शॉर्टसर्किट टाळावे.

जनावरांना पुरेसे अन्न व स्वच्छ पाणी द्यावे.

आजारपण किंवा जखम झाल्यास तातडीने शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.

मृत जनावरांची विल्हेवाट नद्यांमध्ये न करता जमिनीत शास्त्रोक्त पद्धतीने पुरून करावी.


पोल्ट्रीपालकांसाठी विशेष सूचना 

पक्षीगृहात पावसाचे पाणी शिरणार नाही याची दक्षता घ्यावी.

आर्द्रता कमी ठेवावी.

ओले खाद्य टाळावे, कारण त्यात बुरशी होण्याची शक्यता असते.

आजारी पक्ष्यांवर तत्काळ उपचार करावेत व मृत पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावावी.जिल्हा प्रशासनाने पशुधनधारकांना आवाहन केले आहे की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून जनावरांचे व पक्ष्यांचे संरक्षण करावे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads