बालश्रममुक्तीसाठी ‘भिक्खू’ बनले आश्विन बाविस्कर; देहूरोड पुण्यातील शिबिरात दिला अनोखा संदेश - दैनिक शिवस्वराज्य

बालश्रममुक्तीसाठी ‘भिक्खू’ बनले आश्विन बाविस्कर; देहूरोड पुण्यातील शिबिरात दिला अनोखा संदेश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
देहूरोड, पुणे – बालश्रमविरोधी जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष परीक्षण शिबिरात एक आगळावेगळा उपक्रम पाहायला मिळाला. या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते आश्विन मिलिंद बाविस्कर यांनी दोन दिवस भिक्खूचे चिवल परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचा उद्देश स्पष्ट होता — बालश्रममुक्त समाज घडवण्यासाठी समाजात सकारात्मक बदल घडवणे
या वेळी आश्विन बाविस्कर यांनी शांततेचा आणि विचारांचा संदेश देत उपस्थित मुलांशी आणि पालकांशी संवाद साधला. त्यांनी भिक्खूवेषात राहून संयम, करुणा आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या वेगळ्या सादरीकरणामुळे शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात विचारांची नवी पालवी फुलली.
शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थांनी आश्विन बाविस्कर यांचे मन:पूर्वक कौतुक केले. बालश्रममुक्त भारताच्या दिशेने उचललेले हे पाऊल खरंच प्रेरणादायी ठरले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads