ठाकरे गट शिवसेनेला कोणताही धक्का नाही, जामनेरात पुन्हा संघटन उभं राहील – विजय परबरावेर लोकसभा संपर्कप्रमुखांचा ठाम विश्वास - दैनिक शिवस्वराज्य

ठाकरे गट शिवसेनेला कोणताही धक्का नाही, जामनेरात पुन्हा संघटन उभं राहील – विजय परबरावेर लोकसभा संपर्कप्रमुखांचा ठाम विश्वास

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जामनेर तालुका प्रमुख ॲड. ज्ञानेश्वर बोरसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला असला, तरी या घटनेचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचा ठाम दावा रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विजय परब यांनी केला आहे.

जामनेरातील शिवसैनिक लढवय्या आहे, संघर्षशील आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आहे. त्यामुळे एक-दोन व्यक्ती गेल्याने पक्ष डगमगणार नाही. उलट आता नव्या जोमाने संघटन उभं करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. नवख्या कार्यकर्त्यांना संधी देऊन तालुक्यात शिवसेनेचं बळ अधिक वाढवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

विजय परब म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने उतरून संघर्ष करेल. पक्षात कुठलीही अस्थिरता नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, पण ज्यांच्यात खरी शिवसेनेची लढाऊ वृत्ती आहे तेच राहतील आणि जिंकतील.

त्यांच्या या स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रियेमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. पक्ष संघटनाच्या नव्या पर्वाची सुरुवात जामनेरातून होणार असल्याचे संकेत त्यांनी या संवादातून दिले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads