तापी नदीपात्रात अवैध गौणखनिज वाहतूक .. तहसीलदारांच्या धाडसी कारवाईदरम्यान अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली - दैनिक शिवस्वराज्य

तापी नदीपात्रात अवैध गौणखनिज वाहतूक .. तहसीलदारांच्या धाडसी कारवाईदरम्यान अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
यावल, दि. ७ मे २०२५
तापी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध गौणखनिज वाहतुकीवर धडक कारवाई करताना आज यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी मोठा धोका पत्करला. विदगाव (ता. यावल) परिसरात अवैध गौणखनिज भरलेला एक ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच तहसीलदारांनी स्वतः पथकासह पाठलाग सुरू केला.

दरम्यान, ट्रॅक्टरचा पाठलाग करत असताना त्यांचे शासकीय वाहन नदीपात्रात उलटले. सुदैवाने तहसीलदार श्रीमती नाझीरकर व त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगावचे तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीसह बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या धाडसी कारवाईमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आणि निर्भयतेचे दर्शन घडले असून नागरिकांतून तहसीलदार यावल यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads