जगदीश बाबुराव सोनार यांची भाजप जामनेर शहर मंडळ उपाध्यक्षपदी निवड आरोग्यदूत म्हणून परिचित
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ देण्यासाठी प्रेम नगर, जामनेर येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे जगदीश बाबुराव सोनार यांची भाजप जामनेर शहर मंडळ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, तसेच भाजप जामनेर शहर अध्यक्ष श्री. रविंद्र रमेश झाल्टे
यांच्या स्वाक्षरीने हे पत्र अधिकृत करण्यात आले. या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
जगदीश सोनार यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, अनेक गरजू रुग्णांना मदत करून आरोग्यदूत ही खास ओळख निर्माण केली आहे.
भाजपच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शिवस्वराज्य न्यूजच्या वतीनेही जगदीश बाबुराव सोनार यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा