"घर तेथे शिवसैनिक" संकल्पनेतून शिवसेना सदस्य नोंदणीला जामनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद - दैनिक शिवस्वराज्य

"घर तेथे शिवसैनिक" संकल्पनेतून शिवसेना सदस्य नोंदणीला जामनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर (१७ जुलै २०२५)
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली, जामनेर नगर परिषद येथे "घर तेथे शिवसैनिक" या संकल्पनेवर आधारित सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले. हा उपक्रम १७ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत पार पडला.

या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलावर्गाचा विशेष सहभाग व उत्साह उल्लेखनीय होता, तरुण वर्गाने देखील सक्रिय सहभाग नोंदवला. यामधून स्पष्ट दिसून येते की जामनेर तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद दिवसेंदिवस बळकट होत आहे.

कार्यक्रमावेळी शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर

अतुल सोनवणे (उपजिल्हा प्रमुख)

अँड. भरत पवार (तालुका प्रमुख, शिवसेना जामनेर)

नरेंद्र धुमाळ (शहर प्रमुख)

प्रविण ठाकरे (तालुका संघटक)

सुभाष राठोड, बापू बडगुर, खुशाल पवार यांच्यासह इतर शिवसैनिकांचीही उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाने जामनेर तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीला नवी दिशा दिली असून, पुढील काळात पक्षाचा विस्तार वेगाने होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads