शैक्षणिक सहलीद्वारे ज्ञान आणि पर्यावरणाचे अनोखे मिलन!जि. प. केंद्रीय मुलांची उर्दू शाळा, जामनेर यांनी आयोजित केली प्रेरणादायी सहल - दैनिक शिवस्वराज्य

शैक्षणिक सहलीद्वारे ज्ञान आणि पर्यावरणाचे अनोखे मिलन!जि. प. केंद्रीय मुलांची उर्दू शाळा, जामनेर यांनी आयोजित केली प्रेरणादायी सहल

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर (ता. 19 जुलै) – जिल्हा परिषदेच्या केंद्रीय मुलांची उर्दू शाळा, जामनेर यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शहाजान शाह वली दर्गा (कविटवाले बाबा) येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या सहलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "एक पेड़ माँ के नाम 2.0" उपक्रम विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात राबवला.

मुख्याध्यापक श्री. शेख रईस सर यांच्या प्रेरणेतून झालेल्या या उपक्रमात इयत्ता सहावी व सातवीच्या एकूण 105 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजावे या उद्देशाने दर्गा परिसरात नीम, आंबा इत्यादी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणाच्या या सुंदर उपक्रमाने परिसरच नव्हे तर विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनही प्रसन्न झाले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी मैदानात विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळून आनंद लुटला. या वेळी श्री. आसिफ सर यांनी खेळांचे प्रकार आणि त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. रजिया बाजी यांनी शेतातील पिकांची ओळख करून दिली, तर तनवीर सर यांनी हवामानातील बदलांबद्दल विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती दिली.

या शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन व व्यवस्थापन मुख्याध्यापक रईस सर, शकील सर, रजिया बाजी, आसिफ सर व तनवीर सर यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. विद्यार्थ्यांच्या मनावर दीर्घकाळ लक्षात राहील असा हा उपक्रम शाळेसाठी प्रेरणादायी ठरला.



Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads