जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथे धरणात बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; शोककळा
गोंडखेल (ता. जामनेर) – गावात हळहळ निर्माण करणारी दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. गोंडखेल येथील रहिवासी सचिन बालचंद शिहरे यांचा चिरंजीव रणवीर सचिन शिहरे (वय अंदाजे १४ वर्षे) याचा धरणात बुडून मृत्यू झाला.
रणवीर हा ललवाणी शाळेत शिक्षण घेत होता. आज शाळेतून आल्यावर तो बैल चरण्यासाठी शिवारात गेला होता. त्यानंतर धरणाजवळ पोहण्यासाठी गेला असताना अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेने गोंडखेल गावात शोककळा पसरली आहे. अत्यंत हुशार, नम्र आणि शांत स्वभावाच्या रणवीरच्या अचानक जाण्याने शाळा, कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
अंत्ययात्रा आज रात्री ८ वाजता होणार असून, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा