जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई
जळगाव | जिल्हा प्रशासनाची कार्यक्षम आणि तातडीची भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे निवडणूक कामकाज आटोपून मुख्यालयाकडे परत येत असताना, जळगाव शहरातील महामार्गावर संशयास्पदरीत्या वाळू वाहतूक करत असलेले एक डंपर आणि एक ट्रक त्यांच्या निदर्शनास आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही विलंब न करता दोन्ही वाहनांना थांबवले आणि त्यांना तत्काळ तहसीलदार जळगाव तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडे पुढील कायदेशीर तपासणीसाठी सुपूर्द केले.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना गौणखनिज अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम व मोटार वाहन अधिनियम अंतर्गत तपास करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाची ही झपाट्याने झालेली कारवाई बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधातील त्यांची ठाम आणि सजग भूमिका अधोरेखित करते. ही कृती अवैध वाळू तस्करांसाठी इशाराच मानली जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा