मंत्री गिरीश महाजनांचा शेतकऱ्यांना ठाम दिलासा कुठलाही अन्याय होणार नाही, सगळं माझ्यावर सोडा
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर तालुका सहकारी साखर कारखाना विक्रीच्या वादाला आणखी कलाटणी मिळाली आहे. आज पुन्हा एकदा गोंडखेड येथील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर जणू पाडाच वाचला, त्यांच्या मनातील तळमळ आणि ३२ वर्षांचा अपमान उघड केला.
आमच्या जमिनी आमच्याकडे परत याव्यात, इतकीच मागणी आहे. आमच्यावर अन्याय नको,अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली व्यथा व्यक्त केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांचे बोल शांतपणे ऐकले आणि ठाम आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले –
तुम्ही अजिबात घाबरू नका, काहीच चिंता करू नका. सगळं माझ्यावर सोडा. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. या सगळ्या प्रकरणात मी लक्ष घालतो आणि काय करायचं ते पाहतो.
त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला दिसला. मात्र, इतक्या वर्षांच्या फसव्या आश्वासनांनी पोळलेल्या शेतकऱ्यांच्या मनात अजूनही संभ्रम आहे खरंच या वेळी न्याय मिळणार का?
रंजीत शेनफडू राजपूत, प्रभू शेनफडू राजपूत, अर्जुन चोपडे, भगवान चोपडे, जगतसिंग परदेशी, संजय परदेशी, विजय परदेशी, शांताराम जाधव, रवींद्र चोपडे, विलास परदेशी, शांताराम पाटील, मधुकर पाटील, रणजीत पाटील, सिताराम मगर, ईश्वर मगर, भगत राजपूत, भगतसिंग परदेशी, सयाबाई तुकाराम, बन्सीलाल राजपूत, संग्रामसिंग राजपूत आदी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींच्या हक्कासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन आवाज बुलंद केला शेतकऱ्यांचे म्हणणे आहे – मंत्री महाजनांचा शब्द आमच्यासाठी मोठा आधार आहे, पण आम्हाला जमिनी परत मिळाल्या, तेव्हाच खरी दिलासा मिळेल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा