भवानी घाटातील जंगलात २६ वर्षीय तरुणाचा गळफास घेत मृत्यू; आत्महत्येचे कारण अज्ञात - दैनिक शिवस्वराज्य

भवानी घाटातील जंगलात २६ वर्षीय तरुणाचा गळफास घेत मृत्यू; आत्महत्येचे कारण अज्ञात

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर, दि. ११ जुलै 
जामनेर-बोदवड रोडवरील भवानी घाट परिसरात आज दुपारी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत तरुणाचे नाव किरण शरद पाटील (वय २६, रा. बिबा नगर, जळगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण पाटील याने मोटारसायकल जंगलातील रस्त्यालगत लावली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन झाडाला दोरीने गळफास घेतला. जंगलातील मोटारसायकल नागरिकांच्या निदर्शनास आली. शंका आल्याने परिसरात शोध घेतला असता झाडाला लटकलेला मृतदेह दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी गर्दी केली. रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून  पुढील तपास सुरू केला आहे. तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads