जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार ॲक्शन मोडवर... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार ॲक्शन मोडवर...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर : शहरात गेल्या काही दिवसांपासून कॅफेंच्या नावाखाली सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींबाबत चर्चा रंगत होत्या. नागरिकांच्या तक्रारी आणि नुकत्याच घडलेल्या वादातून तरुणाच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आज पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी ॲक्शन मोड दाखवत ८ ते १० कॅफेंवर धडक कारवाई केली.
जळगाव रोड, बीओटी कॉम्प्लेक्स, बेस्ट बाजार मागील भाग यांसह शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कॅफेमधील साहित्य जप्त करून, अनधिकृत कॅफे तातडीने बंद करण्यात आले. कारवाईदरम्यान नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस पथके मोठ्या संख्येने उपस्थित होती.
 मिळालेल्या माहितीनुसार, काही कॅफेंमध्ये “कॉफी आणि स्नॅक्स” पेक्षा वेगळेच प्रकार सुरू असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या. काही ठिकाणी अवैध गेमिंग, नशा आणि तरुणांची उचापत याबाबतचे संशय व्यक्त केले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई नागरिकांकडून जोरदार स्वागतास पात्र ठरली आहे.
मुरलीधर कासार यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला  कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कुठलीही गोडीगुलाबी नाही, शहरातील अनधिकृत व्यवसाय संपवण्यासाठी पुढेही अशाच कारवाया सुरू राहतील.या धडक कारवाईनंतर शहरातील अवैध कॅफे व्यावसायिकांमध्ये चांगलाच खळबळ माजला आहे, तर नागरिकांनी पोलिसांच्या या पावलाचे खुलेआम कौतुक केले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads