महाराष्ट्र
धाडसी तरुणांचे कौतुक! अक्कलकोटमध्ये दोन वयोवृद्ध भगिनींचे प्राण वाचवले....
समीर शेख प्रतिनिधी
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील स्थापत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अभियंता महेश शेडम हे केवळ व्यावसायिक कार्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीही जपत असल्याचे आज घडलेल्या घटनेतून स्पष्ट झाले.
आज अक्कलकोटमध्ये दोन वयोवृद्ध भगिनी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश शेडम व त्यांचे मित्र आकाश चव्हाण यांनी कोणतीही पर्वा न करता तत्काळ बचावकार्य सुरू केले व त्या भगिनींना सुरक्षित बाहेर काढले.
ही घटना माणुसकीचे एक जिवंत उदाहरण ठरली आहे. अशा तरुणांची समाजाला आज नितांत गरज असून अशा चांगल्या कृतीतूनच समाजात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांनी या धाडसी तरुणांचे मनापासून कौतुक केले असून महेश शेडम व आकाश चव्हाण यांचे धाडस कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा