मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल - दैनिक शिवस्वराज्य

मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर – सेवापंधरवड्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबवले जात आहे.
या अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. सर्व महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नसून अभिमान आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मनोगतात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads