फत्तेपूर पोलिसांची धाड – अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणात लाखोंचा मुद्देमाल जप्त...
फत्तेपूर (ता. जामनेर) येथे अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संजय संपत श्रावने (वय 40, रा. सप्तशृंगी नगर, फत्तेपूर) हा आपल्या राहत्या घरासमोर इको चारचाकी (MH 19 DV 6557) मध्ये मशीनच्या साहाय्याने घरगुती LPG गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस भरणा करीत असल्याची माहिती फत्तेपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. अंकुश जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ धाड टाकली.
यानंतर तहसील कार्यालयास माहिती देण्यात आली. तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक श्री. नारायण जयाजी सुर्वे यांनी पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली.या कारवाईतून भारत कंपनीचे 6 गॅस सिलेंडर, चारचाकी वाहन व गॅस भरणारी मशीन असा एकूण ₹3 लाख 22 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी गाडी मालक दीपक रतन वावरे (रा. लोणी) याच्यासह दोघांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 170/2025 अन्वये BNS कलम 287, 288, 3(5) व EC Act 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फत्तेपूर पोलीस व तहसील प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे गावात मोठी चर्चा सुरू आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा