शिल्पकलेत लोंढ्री तांड्याचा गौरव अतुल राठोड प्रथम क्रमांकावर - दैनिक शिवस्वराज्य

शिल्पकलेत लोंढ्री तांड्याचा गौरव अतुल राठोड प्रथम क्रमांकावर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
छत्रपती संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आयोजित केंद्रीय युवा महोत्सव २०२५ मध्ये लोंढ्री तांडा (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील अतुल राठोड यांनी शिल्पकला विभागात प्रथम क्रमांक मिळवून गावाचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला आहे.
२९ सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला, ज्यात कुलगुरू प्रा. (डॉ.) विजय फुलवारी यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांजुळे आणि कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरिकर यांच्या हस्ते अतुल राठोड यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अतुल राठोडच्या कलात्मक प्रतिभेची विशेष दखल घेतली गेली आणि त्यांच्या भविष्यातील कलात्मक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गावकरी आणि विद्यार्थी यांच्यात आनंद व अभिमान पाहायला मिळाला.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads