भुसावळ तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
भुसावळ – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाला भुसावळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जि.प. शाळा कन्हाळे खुर्द (ता. भुसावळ) येथे इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कन्हाळे बु. येथील सरपंच मोहन पाटील, प्र. सरपंच सौ. रेखाताई सपकाळे, माजी सरपंच गुणवंत नेमाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम सुरळकर, भाजपा कार्यकर्त्या सौ. प्रियंकाताई चौधरी, मिलींद चौधरी, दिपक सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य कमलेश सोनवणे तसेच जय जवान जय किसान मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. उज्वला शरद कोळी यांनी केले. भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे संच देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रामीण भागात होत असलेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.हा उपक्रम केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे व महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रेरणेने राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
ग्रामीण पातळीवर सेवा आणि संस्कार यांचे संगम घडविणारा हा उपक्रम शालेय मुलांसाठी प्रेरणादायी ठरला असून पुढील काळात अशाच सामाजिक उपक्रमांची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा