भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये गळीत हंगामाचा शुभारंभ.... संयम, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर 10 लाख मेट्रिक टन गाळपाचे लक्ष्य — अध्यक्ष महेश देशमुख - दैनिक शिवस्वराज्य

भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये गळीत हंगामाचा शुभारंभ.... संयम, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर 10 लाख मेट्रिक टन गाळपाचे लक्ष्य — अध्यक्ष महेश देशमुख


समीर शेख प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर (भंडारकवठे) : लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेड, भंडारकवठे येथे गळीत हंगाम 2025-26 च्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ झाला. हा सोहळा कारखान्याचे सर्वेसर्वा व मार्गदर्शक सतीश देशमुख, अध्यक्ष महेश देशमुख आणि संचालक पराग पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
      यावेळी अध्यक्ष महेश देशमुख म्हणाले, “भंडारकवठे कारखान्याने नेहमीच संयम, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर विक्रमी गाळप केले आहे. यंदाचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करून 10 लाख मेट्रिक टन गाळपाचा नवा विक्रम प्रस्थापित करावा.”
    ते पुढे म्हणाले, “सर्व ऊस उत्पादकांची देयके अदा केली असून, तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. कारखान्याने शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी सदैव वचनबद्धता जपली आहे.”
      यानंतर झालेल्या ऊस तोडणी वाहतूक ठेकादारांच्या बैठकीत सतीश देशमुख म्हणाले, “लोकमंगल साखर कारखाना हा दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. ऊस उत्पादक, तोडणी यंत्रणा आणि कर्मचारी हेच या कारखान्याचे खरे बळ असून त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदा विक्रमी गाळप साध्य होईल.”
     या वेळी सरव्यवस्थापक (टेक्निकल) रुद्रमठ, सरव्यवस्थापक गुणांनसेकरण, सहायक सरव्यवस्थापक दीपक नलावडे, विविध विभागप्रमुख तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads