महाराष्ट्र
दिवसा घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद ; सोलापूर गुन्हे शाखेची धमाकेदार कारवाई...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : शहरातील विजापूर रोड व विशाल नगर परिसरात दिवसा घरफोडी करून नागरिकांना हैराण करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ₹3 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
नवरात्र उत्सव काळात विजापूर रोडवरील अंबिका रेसिडेन्सी परिसरात फिर्यादी रेखा कैलास चौधरी यांच्या घराचे कुलूप तोडून साडेचार तोळे सोन्याचे दागिने (₹2.47 लाख) चोरले गेले होते. त्याच दिवशी विशाल नगर भागात सौ. पुनम सतिश वांगी यांच्या घरातही चोरी होऊन ₹22 हजार रोख, सोन्याचे मंगळसूत्रे व चांदीचे आरती साहित्य (₹1.17 लाख) असा ऐवज लंपास करण्यात आला होता.
या दोन्ही गंभीर घरफोडींचा तपास स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हातात घेतला. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवत पोलिसांनी सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (वय 34, रा. चिंचवड, पुणे) यास पिंपरी चिंचवड येथून अटक केली. त्यानंतर राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय 35, रा. वाघोली, जि. धाराशिव) यास अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींकडून 3 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागिने व मोटारसायकल असा एकूण ₹3.15 लाख किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, तात्या पाटील, बापू साठे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पो.स्टेचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा