जामनेर नगराध्यक्षपदासाठी समाजवादी पक्षाकडून कमरुननिसा बी शेख मैदानात – तालुका अध्यक्ष रऊफ शेख यांची घोषणा
समाजवादी पक्षाचे जामनेर तालुका अध्यक्ष रऊफ शेख यांनी समाजातील गरिब, अपंग, विधवा आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी गेल्या काही वर्षांत केलेल्या कार्यामुळे जनतेत आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे जामनेर शहरात त्यांचे नाव लोकसेवक म्हणून घेतले जाते.रऊफ शेख यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना** अंतर्गत अनेक गरजू लाभार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने पगार मंजूर करून दिले, तर गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मदत केली. याशिवाय त्यांनी विधवा महिला, अपंग नागरिक आणि विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्पन्न दाखले विनामूल्य देण्याचे कार्य त्यांनी केले.
नगरसेवक झाल्यास, रऊफ शेख यांनी गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी चॅरिटेबल हॉस्पिटल विधवा महिलांसाठी शिवण मशीन प्रशिक्षण वर्ग आणि MPSC–UPSC मोफत मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे.दरम्यान, रऊफ शेख यांनी एका निवेदनात सांगितले की, यावेळी समाजवादी पक्षाच्या वतीने त्यांच्या आई कमरुननिसा बी शेख महेमुद या येणाऱ्या निवडणुकीत जामनेर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत.शहरातील अंदाजे सुमारे १३,००० मुस्लिम मतदारांच्या निर्णायक भूमिकेमुळे या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. रऊफ शेख यांच्या समाजसेवेचा आणि कमरुननिसा बी यांच्या लोकप्रियतेचा समाजवादी पक्षाला फायदा होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा