जामनेरात भव्य रावण दहनाची तयारी जोरात.... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात भव्य रावण दहनाची तयारी जोरात....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरात दशहरा उत्सवाच्या पारंपरिक रावण दहनासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. या वर्षीचे रावण दहन मंत्री गिरीश महाजन आणि सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते केले जाणार आहे.उत्साहात रंगलेल्या या कार्यक्रमात नगरातील नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे सदस्य सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन आहे. रावण दहनाची सोहळा संपूर्ण कुटुंबासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, उत्सवाच्या पारंपरिक रंगात नगर रंगून जाईल.आयोजकांनी नागरिकांना विनंती केली आहे की, सर्वांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत या आनंदसोहळ्यात सहभागी व्हावे.
 तारीख आणि वेळ: 2/10/2025 सायंकाळी 7 वाजता
स्थळ: दसरा मैदान मम्मा दैवी मंदिर समोर, जामनेर 
या दशहरा उत्सवात सहभागी होऊन रावण दहनाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिस करू नका





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads