महाराष्ट्र
अकोले मंद्रूपमध्ये उद्योगपती रमेश अण्णांची सामाजिक बांधिलकी ठरली आदर्श! सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ; अकोले मंद्रूप ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : गावावर ओढवलेल्या पूरस्थितीत अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना, गावातील उद्योगपती व समाजसेवक रमेश (अण्णा) आसबे यांनी पुढे सरसावून मानवतेचा खरा धर्म जपला.
पूराच्या भीषण परिस्थितीत आसबे यांनी स्वखर्चाने वाहनांची व्यवस्था करून नागरिकांचे घरगुती साहित्य सुरक्षित स्थळी पोहोचवले. एवढेच नव्हे, तर पूरग्रस्त नागरिकांसाठी जेवणाची सोय करून त्यांना तात्पुरता दिलासा दिला.
संकटाच्या काळात विस्थापित झालेल्या नागरिकांना आसबे यांनी स्वतःच्या शेतात आणि घरामध्ये राहण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली, ज्यामुळे अनेक कुटुंबांना आसरा मिळाला.
पूर ओसरल्यानंतर त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांचे अश्रू हसण्यात परिवर्तित झाले.
गावातील सर्वच स्तरातून आसबे यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि तत्पर सेवाभावाचे भरभरून कौतुक होत आहे. ग्रामस्थांनी एकमुखाने म्हटले की “आसबे अण्णांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि सेवा वृत्ती ही प्रत्येक समाजसेवकासाठी प्रेरणादायी आहे.”
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा