शिवसेना (शिंदे गट) युवा सेना जामनेर — नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार
आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी जामनेरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि युवा सेनेने स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या संदर्भात विशाल लॉन्स, जामनेर येथे भव्य बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणुकीसाठीची रणनिती आखण्यात आली. शहरातील शिवसैनिक आणि युवासैनिकांचा उत्साह पाहता बैठक अत्यंत जोशात पार पडली.
बैठकीत प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये
कैलास माळी (उपतालुकाप्रमुख), भरत पवार (तालुका प्रमुख), विशाल लामखडे (युवासेना तालुकाप्रमुख), दिग्विजय पाटील (युवासेना उपजिल्हाप्रमुख), राहुल नाईक, नाना वंजारी, नानू भाऊ चौव्हाण, सुभाषभाऊ राठोड, प्रशांत बहरात, दीपक तिडके, योगेश पाटील, आनंदा कोळी, दत्तात्रय पाटील, गोकुळ गोडवे यांची उपस्थिती होती.
बैठकीत येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तसेच प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले.
शिवसेना (शिंदे गट) आणि युवा सेनेने स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय आता जामनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा