अतिवृष्टीमुळे जामगाव खुर्द परिसरातील पिकांचे मोठे नुकसान... हवालदिल शेतकऱ्यांना न्याय द्या ; सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी... - दैनिक शिवस्वराज्य

अतिवृष्टीमुळे जामगाव खुर्द परिसरातील पिकांचे मोठे नुकसान... हवालदिल शेतकऱ्यांना न्याय द्या ; सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी...


समीर शेख प्रतिनिधी 
जामगाव : दिनांक १७ सप्टेंबरपासून मोहोळ तालुक्यात सलग तीन-चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जामगाव, वटवटे व परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतांतील पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
    नागरिकांनी बहुजन आवाज न्यूज चॅनल शी बोलताना सांगितले की, शासनाने अद्याप या नुकसानीची योग्य दखल घेतलेली नाही. शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने तातडीने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी होत आहे.
   दरम्यान तहसीलदार सचिन मुळीक यांनी तोंडी आदेश दिले असले तरी तलाठ्यांकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. त्यामुळे लेखी आदेश देऊन ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
    शेतकरी म्हणाले की, “आमचे संपूर्ण पीक वाया गेले आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी.”
   या प्रसंगी जामगाव खुर्द गावचे सरपंच पपीता फडतरे, महिला शेतकरी कमल फडतरे, उपसरपंच रेखा हक्के, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हक्के, बिळु नागणसूरे, रंगनाथ पुजारी, चांगदेव हक्के, पांडुरंग थोरात, पांडुरंग फडतरे, नोमीनाथ थोरात, बाबुराव हाके, सोमलिंग हक्के, महेश साठे, आप्पा थोरात, हिरणा फडतरे, रोहिदास फडतरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    🔴जामगाव खुर्द येथील अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या सर्व शेतकऱ्याच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करावे...
सौ.पपीता फडतरे, 
सरपंच , जामगाव खुर्द
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads