महाराष्ट्र
जिव्हाळा मतिमंद शाळेत सर्वधर्मीय दीपोत्सव साजरा...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा, सोलापूर येथे दीपोत्सवाच्या औचित्याने सर्वधर्मीय एकतेचा सुंदर संदेश देणारा दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मतिमंद मुलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक सरफराज अहमद यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आस्मा खान होत्या. विचारपीठावर प्रो. आफताब शकील मुल्ला, हसिफ नदाफ, शबनम शेख, ॲड. निलोफर शेख, सईद शहा वायेज, पत्रकार अरविंद मोटे, कॉ. रवींद्र मोकाशी, ॲड. सरिता मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता बालगावकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. उद्घाटनावेळी डॉ. बालगावकर यांनी सांगितले की, “जसे ईदला मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना शिरखुरमा प्यायला बोलावतात, तसेच आपण दिवाळीला त्यांना फराळाला बोलावले पाहिजे, या विचारातून हा सर्वधर्मीय दीपोत्सव साजरा करण्यात आला.”
या निमित्ताने संस्थेचे विद्यार्थी, कर्मचारी, पालक तसेच विविध क्षेत्रातील समाजसेवक व मुस्लिम बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेखक सरफराज अहमद यांनी विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याचे कौतुक करत “हे कार्य समाजासाठी अमूल्य आहे,” असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अण्णाराव राजमाने, मुख्याध्यापक कल्पेश नष्टे, उपाध्यक्ष आशालता राजमाने, मुमताज सय्यद उपस्थित होते.
मतिमंद मुलांनी तयार केलेल्या आकाशकंदील, पणत्या, वाती, पिशव्या, खिरी इत्यादी वस्तूंची विक्री करण्यात आली. “समाजात बंधुता आणि एकोपा टिकवण्यासाठी असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत,” असे मत कॉ. रवींद्र मोकाशी यांनी व्यक्त केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा