भुसावळ तालुक्यातील कन्हाळे खुर्द येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न! - दैनिक शिवस्वराज्य

भुसावळ तालुक्यातील कन्हाळे खुर्द येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
भुसावळ तालुक्यातील कन्हाळे खुर्द येथे महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने एक भव्य आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला ग्रामस्थांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाधान भाऊ पवार (माजी जिल्हा परिषद सदस्य, जळगाव), भालचंद्र भाऊ पाटील (माजी सभापती, पंचायत समिती भुसावळ) उपस्थित होते.
तसेच कन्हाळे गावाचे सरपंच मोहन भाऊ पाटील, प्र. सरपंच सौ. रेखाताई सपकाळे, माजी सरपंच गुणवंत नेमाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम सुरळकर, भाजपा कार्यकर्त्या सौ. प्रियंकाताई चौधरी, मिलींद चौधरी, दिपक सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य कमलेश सोनवणे, तसेच भाजपा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. उज्वला शरद कोळी यांनी केले होते. या शिबिरात आरोग्य तपासणीबरोबरच नागरिकांना विविध आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

या आरोग्य शिबिराचे आयोजन भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. ग्रामीण भागात होत असलेल्या अशा उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

ग्रामीण पातळीवर सेवा आणि संस्कार यांचे संगम घडविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, पुढील काळात अशाच सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads