गारखेडाजवळ सिमेंट मिक्सर–पॅगो रिक्षाचा भीषण अपघात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, 5 ते 7 जण गंभीर जखमी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
गारखेडाजवळ सिमेंट मिक्सर–पॅगो रिक्षाचा भीषण अपघात
तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, 5 ते 7 जण गंभीर जखमी
जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ आज
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सिमेंट मिक्सर आणि पॅगो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण तालुका हादरून गेला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, तर एकाचा जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. यासह ५ ते ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.या भीषण घटनेत निकिता गोपाल निंबाळकर (रा. चिंचखेडा) आणि प्रमोद श्रीराम गुरूभैय्या (रा. तळेगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गंभीर जखमींची नावे
जयेश गोपाल निंबाळकर – चिंचखेडा
सरला गोपाल निंबाळकर – चिंचखेडा
योगेश विठ्ठल गायकवाड – चिंचखेडा
सुरेखा विलास कापडे – छत्रपती संभाजीनगर
अखिलेश कुमार – उत्तर प्रदेश
संगीता सुभाष चौधरी – छत्रपती संभाजीनगर
सर्व जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून काही जखमींची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका व मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.या हृदयद्रावक घटनेमुळे चिंचखेडा, तळेगाव व छत्रपती संभाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा