जामनेरात पाचोरारोड वर भीषण अपघात...
जामनेर – पाचोरा रोडवर भीषण अपघात; नागरिक व पोलीसांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल
जामनेर शहरातील पाचोरा रोडवर आज सायंकाळी पाचच्या सुमारास मोठा अपघात झाला. एक जड कंटेनर रस्त्यावर भरधाव वेगाने जात दुचाकील धडक देत पूर्ण दुचाकीचा चुराडा झाला. या दुर्घटनेत सोनाळा येथील विजय कैलास पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात होताच काही क्षणांतच ठिकाणी मोठी गर्दी जमली. उपस्थित नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्याचवेळी जामनेर पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.
अॅम्ब्युलन्स चालक जालमभाऊ राजपूत यांनी जखमीला सुरक्षितपणे अॅम्ब्युलन्समध्ये हलवून जळगाव जिल्हा रुग्णालयात तातडीने पोहोचवण्यात आले.
अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा