महाराष्ट्र
हत्तरसंग ग्रामपंचायतीकडून मालमत्ता व पाणीपट्टी करात ५० टक्के सवलत ; ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन ....
समीर शेख प्रतिनिधी
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत, चालू वर्षाच्या करासह थकबाकीची ५० टक्के रक्कम एकाच वेळी भरल्यास, निवासी मालमत्ता धारकांना पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या थकबाकीत ५० टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती अशोक सोनकंटले ग्रामपंचायत सदस्य हत्तरसंग यांनी दिली आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग ग्रामपंचायतच्या वतीने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करामध्ये ५० टक्के सवलत जाहीर केली आहे.
ही सवलत फक्त अभियान कालावधीत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. या योजनेनुसार, ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. नागरिकांना चालू २०२५-२६ या वर्षाचा पूर्ण कर एकरकमी भरावा लागणार आहे. १ एप्रिलपूर्वीची थकबाकी भरता ५० टक्के सवलत लागू होईल. मात्र, थकबाकीवरील सवलतीची उर्वरित रक्कमही एकरकमीच भरावी लागणार असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.या योजनेला गावपातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असून तरी ग्रामस्थांनी या संधीचा फायदा करून घ्यावा अशी माहिती अशोक सोनकंटले ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले
🛑हत्तरसंग गावातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुजाण नागरिकांनी थकबाकी व चालू वर्षांचा कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी हत्तरसंग ग्रामपंचायत अधिकारी कुशाबा इंगळे, आणि ग्रामपंचायत कर्मचारी यशवंत भतगुणकी यांच्याशी संपर्क साधावा.
अशोक सोनकंटले
ग्रामपंचायत सदस्य हत्तरसंग
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा