मंद्रूपची मळसिध्द यात्रा यंदा अधिक भव्य ; कृषी प्रदर्शन व दीपोत्सवाचे आयोजन.... - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूपची मळसिध्द यात्रा यंदा अधिक भव्य ; कृषी प्रदर्शन व दीपोत्सवाचे आयोजन....


 समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील श्री मळसिध्द यात्रेत यंदा शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन आणि लक्ष दीपोत्सव आयोजित करण्यात येणार असून, हे दोन्ही उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार नियोजन बैठकीत करण्यात आला.
    मळसिध्द यात्रेच्या नियोजनासंदर्भात यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, अप्पाराव कोरे, हर्षवर्धन देशमुख, मळसिध्द मुगळे, रमेश नवले, जगन्नाथ म्हेत्रे, सुरेश पाटील, बाळासाहेब देशमुख, मळसिध्द पुजारी, गौरीशंकर मेंडगुदले, कांतू ख्याडे, चंद्रकांत देशमुख, विश्वनाथ हिरेमठ, मुत्या वाडकर, तमण्णा पुजारी, सुरेश टेळे, नितीन टेळे, शब्बीर मुल्ला, अविनाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी यंदापासून यात्रा कालावधीत शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करावे, तसेच मंदिर परिसर व नंदीध्वज मिरवणूक मार्गावर लक्ष दीपोत्सव साजरा करावा, मंदिर परिसरात धूळ उडू नये म्हणून हिरवे मॅट अंथरावेत अशी सूचना मांडली. या सूचनांना प्रतिसाद देत अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांनी यंदापासून कृषी प्रदर्शन सुरू करण्याचा निर्धार जाहीर केला. तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी लक्ष दीपोत्सव आणि हिरवे मॅट अंथरण्याची घोषणा केली.
     दरवर्षी नंदीध्वज मिरवणुकीस उशीर होत असल्याने यंदा सर्व नंदीध्वजांच्या मिरवणुका यात्रा कालावधीत वेळेत निघाव्यात अशा सूचना सर्व मानकरी बांधवांना देण्यात आल्या. यावेळी यात्रा कालावधीत कांतू ख्याडे यांच्या वतीने रांगोळी सेवा देण्यात येईल, अशी ग्वाहीही देण्यात आली.
    यंदाही सलग पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व जाती-धर्मांचे, मंद्रूपसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन यंदाचा यात्रा महोत्सव अभूतपूर्व साजरा करण्याचा निर्णय एकमताने झाला. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी केले, तर आभार हर्षवर्धन देशमुख यांनी मानले. यावेळी सिकंदर आवटे उपस्थित होते.
🛑तीन दिवस कृषी प्रदर्शन ....
मंद्रूपच्या मळसिध्द यात्रेत यंदा दोन ते तीन दिवस कृषी प्रदर्शन भरविण्याचा संकल्प आम्ही केला आहे. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक शेती कसे करावेत,शेतीमध्ये कोणते उपकरणे वापरावेत यासह शेतीमधील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान घेण्याचा संकल्प आहे. तसेच अक्षता सोहळ्या दिवशी लक्ष दीपोत्सव होईल. मंद्रूपसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या यात्रेत तन-मन-धनाने सहभागी व्हावेत‌ असे आवाहन मळसिध्दप्पा यात्रा कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट राजेश देशमुख यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads