महाराष्ट्र
🔥 राजकीय वर्तुळात खळबळ! सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष किरण राठोड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर शहराच्या राजकारणात आज मोठी व महत्त्वाची घडामोड घडली असून काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष व तडफदार युवा नेते किरण राठोड यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार व संपर्क प्रमुख मा. संजय कदमजी साहेब यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
आण्णा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य करत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलने करणाऱ्या किरण राठोड यांनी अनेक वेळा जनतेला न्याय मिळवून दिला आहे. काँग्रेसमधील एक प्रभावी व धाडसी युवा नेतृत्व शिवसेनेत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रवेशावेळी बोलताना किरण राठोड यांनी सांगितले की, “शिवसेनेचे लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांचे विकासाचे व जनहिताचे कार्य तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, जिल्हाप्रमुख अमर दादा पाटील, अमोल बापू शिंदे, शहरप्रमुख सचिन चव्हाण, महिला जिल्हा संपर्क प्रमुख अनिता ताई माळगे, माजी जिल्हा प्रमुख व नगरसेवक मनोज भाईजी शेजवाळ, माजी जिल्हा प्रमुख मनीष काळजे, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख एजाज शेख (सर), शहरप्रमुख गफूर दादा शेख, उपशहर प्रमुख मोईन शेख, शहर जिल्हा संपर्क प्रमुख रजाक मालक मुजावर, मोहसीन शेख (नेता) यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
✨ किरण राठोड यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत भर पडणार असून सोलापूर शहरातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा