महाराष्ट्र
माजी आमदार दिलीपराव माने यांचा भाजपमध्ये प्रवेश....
समीर शेख प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी महत्त्वाची घडामोड आज घडली असून काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला.
मुंबई : राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी महत्त्वाची घडामोड आज घडली असून काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला.
या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिलीपराव माने हे राज्यातील अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. काँग्रेस पक्षात दीर्घकाळ कार्यरत राहून त्यांनी आमदार म्हणून मतदारसंघातील विकासकामे, सामाजिक प्रश्न, शेतकरी व सर्वसामान्यांच्या समस्या विधानसभेत ठामपणे मांडल्या. ग्रामीण विकास, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि शेतकरी हित हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहेत.
पक्षप्रवेशानंतर बोलताना दिलीपराव माने म्हणाले,
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेले विकासकार्य तसेच महाराष्ट्रात भाजप सरकारच्या लोककल्याणकारी योजना यामुळे मी प्रभावित झालो आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.”
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीपराव माने यांचे भाजपमध्ये स्वागत करताना सांगितले की, “दिलीपराव माने यांचा अनुभव, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी भाजपसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल.”
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही माने यांचे स्वागत करत, आगामी काळात संघटनात्मक बांधणीसह जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे प्रभावी काम केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
दिलीपराव माने यांच्या भाजप प्रवेशामुळे संबंधित मतदारसंघासह राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा