नाशिकच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था तर्फे राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर जामनेरचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र रमेश पाटील होणार सन्मानित - दैनिक शिवस्वराज्य

नाशिकच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था तर्फे राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर जामनेरचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र रमेश पाटील होणार सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
नाशिक : सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रनिष्ठ कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय २०२४-२५ चा ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार जामनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. जितेंद्र रमेश पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे दिमाखात करण्यात आले आहे. राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात सन्माननीय न्यायमूर्ती वसंतराव शिवराम पाटील (सेवामुक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, मुंबई) यांच्या हस्ते तसेच शहीद सार्जेंट मिलिंद खैरनार यांच्या वीरपत्नी सौ. हर्षदा खैरनार यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकच्या महापौर सौ. हिमगौरी आडके-आहेर राहणार असून नामको बँकेचे चेअरमन हेमंत भाद्रक, नाईक एज्युकेशन सोसायटीचे सचिव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब संतोष मराठे तसेच नाशिकचे पोलीस आयुक्त आयपीएस संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
श्री. जितेंद्र रमेश पाटील हे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक उपक्रम, ग्रामीण विकास, युवकांना मार्गदर्शन तसेच शेती क्षेत्रातील नव्या प्रयोगांमुळे त्यांनी विशेष नावलौकिक मिळवला आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय योगदानाची दखल घेऊन संस्थेने त्यांना या राज्यस्तरीय सन्मानासाठी निवडले आहे.
या पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व स्वागताध्यक्षांनी केले आहे. जामनेर तालुक्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात असून विविध स्तरांतून श्री. पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads