उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करा – राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करा – राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री स्व. Ajit Pawar यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार) गटाच्या जामनेर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, असेही नमूद करण्यात आले आहे.कार्यकर्त्यांनी सांगितले की, घटनेतील अनेक बाबी संशयास्पद असल्याने केवळ अपघात म्हणून प्रकरण दडपून टाकू नये. सखोल तपास करून संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.निवेदन देताना दिलीप खोडपे, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, तुषार सपकाळ, प्रल्हाद बोरसे, नरेंद्र जंजाळ, मोहन चौधरी, अण्णा तायडे, सागर कुमावत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या मागणीमुळे जामनेर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads