महाराष्ट्र
राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सोलापूरचा जलवा; ‘राज’च्या विद्यार्थ्यांची १००% सुवर्ण कामगिरी!....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राज प्रोएक्टिव्ह अबॅकस, सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शहराचा मान उंचावला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शंभर टक्के निकालाची नोंद केली.
विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मानांकित रँक मिळवत केंद्राचा लौकिक वाढवला. रोनक राजेश बिंगी (इ. ६ वी) याने प्रथम क्रमांक पटकावत विशेष चमक दाखवली. तसेच दिप्ती लक्ष्मीकांत बत्तुल (क्रमांक ८), प्रगती विरेश कलशेट्टी (क्रमांक १६), ऋतिका रवि चिप्पा (क्रमांक १३), श्रवंती माणिक फलमारी (क्रमांक १७), श्रेयस धिरज चौधरी (क्रमांक १८), श्रियांश श्रीकांत कटकम (क्रमांक १८), स्वराज संदीप पतंगे (क्रमांक १८), जोहेब शकील मुलाणी (क्रमांक १६) आणि समिक्षा अमोल शिंदे (क्रमांक १६) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव, अचूक मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा असल्याचे संस्थेचे संचालक राजेंद्र करली यांनी सांगितले. “राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी सोलापूरसाठी अभिमानास्पद असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
केंद्राच्या समन्वयक वीणा करली यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा