जिल्हा स्तरावर इंडियन पब्लिक स्कूलच्या शिक्षकांचा गौरव ; साने गुरुजी कथामाला पुरस्काराने सन्मान.... - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हा स्तरावर इंडियन पब्लिक स्कूलच्या शिक्षकांचा गौरव ; साने गुरुजी कथामाला पुरस्काराने सन्मान....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हा पुरस्कार इंडियन पब्लिक स्कूल व अक्षर ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांना प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून महासिद्ध वाले, गणेश बंडगर सर आणि नागराज सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
     या सोहळ्यात शिक्षकांना साने गुरुजींची प्रतिमा, प्रमाणपत्र, तसेच श्यामची आई हे पुस्तक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
      यंदा जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेस बसवण्याचा मान संस्थेने पटकावला असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे संस्थेला जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
    या यशाबद्दल शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads