वाघारी येथील डॉ. देवानंद सरताळे यांचा समाजाला प्रेरणादायी संदेश वाढदिवस साजरा करण्याची अनोखी पद्धत
आजकाल वाढदिवस म्हटले की मोठे कार्यक्रम, केक-कटिंग आणि वायफळ खर्च अशी प्रथा दिसून येते. मात्र जामनेर तालुक्यातील वाघारी येथील डॉ. देवानंद सरताळे यांनी आपला वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.दि. १३ मार्च २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त त्यांनी बोदवड येथील आत्मसन्मान फाऊंडेशन येथे राहणाऱ्या गोरगरीब व गरजू बांधवांना संध्याकाळचे अन्नदान देत आपला आनंद त्यांच्यासोबत वाटला. समाजातील वंचित घटकांबद्दलची आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी हा उपक्रम राबवला.
आजच्या काळात अनेक जण वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर खर्च करतात, परंतु डॉ. सरताळे यांनी कोणताही वायफळ खर्च न करता गरजूंच्या पोटाची भूक भागवण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आत्मसन्मान फाऊंडेशनमध्ये राहणाऱ्या गरजू नागरिकांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत डॉ. सरताळे यांना मनापासून आशीर्वाद दिले. वाढदिवस साजरा करायचा तर अशाच समाजोपयोगी पद्धतीने करावा,” असा संदेश त्यांच्या या कृतीतून समाजाला मिळाला आहे.
डॉ. देवानंद सरताळे हे वैद्यकीय सेवा देतानाच सामाजिक कार्यातही नेहमी पुढाकार घेत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळत असून अनेकांनी अशाच प्रकारे वाढदिवस साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
डॉ. सरताळे यांच्या या उपक्रमामुळे मानवतेचा खरा संदेश देण्यात आला असून त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजूंशी वाटला, हीच खरी सेवा,असे म्हणत अनेकांनी डॉ. सरताळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा