वडापूर येथे “सन्मान स्त्री शक्तीचा” कार्यक्रम; कर्तृत्ववान महिलांचा गौरव... - दैनिक शिवस्वराज्य

वडापूर येथे “सन्मान स्त्री शक्तीचा” कार्यक्रम; कर्तृत्ववान महिलांचा गौरव...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर सोशल फाउंडेशन व किल्ले प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सन्मान स्त्री शक्तीचा” हा कार्यक्रम दि. १४ मार्च २०२६ रोजी वडापूर येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
     समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये भागीरथी वसंत भुसनर, सुधा भिखू फाळके, संगीता दत्ता भोई, सुनीता रेवाप्पा कोळी व कल्पना भजनावळे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जकराया माशाळे यांनी केले, तर प्रस्तावना सुशांत वाघचवरे (संस्थापक अध्यक्ष, किल्ले प्रतिष्ठान) यांनी मांडली. उपस्थित सर्व महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
    यावेळी प्रमुख उपस्थित अरुण पाटील सर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांचे समाजातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच सोलापूर सोशल फाउंडेशन व किल्ले प्रतिष्ठान यांच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.
    या कार्यक्रमाचा समारोप रामचंद्र जाधव यांनी आभार प्रदर्शनाने केला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads